कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र मराठी
शासनाच्या पशुसंवर्धन विभागाद्वारे राज्यातील नागरिकांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.
या योजनेअंतर्गत राज्यातील जे व्यक्ती कुकुट पालनासाठी इच्छुक आहेत त्यांना कुकुट पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी 75 टक्के म्हणजे 1 लाख 60 हजार रुपयांपर्यंत आर्थिक अनुदान देण्यात येते.
राज्य शासन राज्यातील नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी सतत प्रयत्नशील असते आणि त्यासाठी सरकार वेळोवेळी विविध योजनांची सुरुवात करत असते त्या योजनांपैकीच एक कुकुट पालन योजना आहे.
राज्यातील बहुतांश युवक स्वतःचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक असतात त्यांना कुकुट पालन व्यवसाय हा एक उत्तम पर्याय मानला जाऊ शकतो त्यामुळे राज्यातील बेरोजगार युवकांना रोजगार प्राप्त व्हावा व राज्यातील बेरोजगार कमी होऊन पशु पालनाला चालना मिळावी व राज्याचा औद्योगिक विकास व्हावा हा उद्देश समोर ठेवून राज्यात कुकुट पालन योजनेची सुरुवात करण्यात आली.
महाराष्ट्र कुकुट पालन योजनेचा मुख्य उद्देश राज्यात कुकुट पालन उद्योगाला चालना देऊन युवकांना पशु पालनासाठी प्रोत्साहित करणे आहे जेणेकरून युवक स्वतःचा उद्योग सुरु करून राज्यातील बेरोजगारी कमी होईल.
वाचकांना विनंती
आम्ही कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र मराठी ची संपूर्ण माहिती या लेखात दिली आहे त्यामुळे कृपया करून तुम्ही हा लेख शेवट पर्यंत वाचा व या योजनेचा लाभ मिळवा तसेच तुमच्या परिसरात जे कोणी नागरिक कुकुट पालनासाठी इच्छुक असतील तर त्यांना या योजनेची माहिती अवश्य द्या किंवा त्यांना हि माहिती शेयर करा जेणेकरून ते या योजनेअंतर्गत अर्ज करून कुकुट पालन उद्योग सुरु शकतील.
योजनेचे नाव | कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र मराठी |
राज्य | महाराष्ट्र |
विभाग | कृषी,पशुसंवर्धन,दुगधव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभाग |
उद्देश | नागरिकांना कुकुट पालन करण्यासाठी आर्थिक अनुदान देणे |
लाभार्थी | राज्यातील नागरिक |
लाभ | 1 लाख 60 हजारांपर्यंत आर्थिक अनुदान |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र चा मुख्य उद्देश
- राज्यातील जे बेरोजगार युवक स्वतःचा कुकुट पालनाचा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांना 75 टक्क्यांपर्यंत आर्थिक अनुदान उपलब्ध करून देणे.
- राज्यातील बेरोजगारी कमी करणे
- पशु पालनाला चालना देणे.
- राज्यातील शेतकऱ्यांना शेती सोबत जोडधंदा म्हणून कुकुट पालन उद्योग सुरु करता यावा.
- राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करणे
- राज्याचा औद्योगिक विकास करणे.
- राज्यातील बेरोजगार नागरिकांना कुकुट पालन उद्योग सुरु करण्यासाठी आकर्षित करणे.
कुक्कुट पालन अनुदान योजना वैशिष्ट्ये
- पशुसंवर्धन विभागाद्वारे या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे.
- या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद हे राहतील.
- स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न बघणाऱ्या नागरिकांसाठी हि एक उत्तम योजना आहे.
- योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया सोपी ठेवण्यात आलेली आहे.
- योजनेअंतर्गत दिली जाणारी अनुदानाची राशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT च्या सहाय्याने जमा करण्यात येते.
कुक्कुट पालन योजना मराठी अंतर्गत 1000 मांसल पक्षी संगोपनाचा बाबनिहाय खर्चाचा तपशील खालीलप्रमाणे आहे.
या राज्यस्तरीय योजनेअंतर्गत एका युनिटद्वारे (प्रति लाभार्थी) 1000 मांसल कुक्कुट पक्षी संगोपनाद्वारे कुक्कूट पालन व्यवसाय सुरु करणे आवश्यक आहे.
तपशील | लाभार्थी / शासन सहभाग | एकूण अंदाजित किंमत | |
1 | जमीन | लाभार्थी | स्वतःची / भाडेपट्टीवर घेतलेली |
2 | पक्षिगृह (1000 चौ.फूट) स्टोअर रूम, पाण्याची टाकी, निवासाची सोय, विद्युतीकरण इत्यादी | लाभार्थी / शासन | 2 लाख रुपये |
3 | उपकरणे, खाद्याची / पाण्याची भांडी, बुडणार इत्यादी | लाभार्थी / शासन | 25 हजार रुपये |
एकूण | 2 लाख 25 हजार रुपये |
- या योजनेअंतर्गत वर नमूद केल्याप्रमाणे पक्षी संगोपनासाठी पक्षीगृह व इतर मुलभूत सुविधा उभारणेकरीता सर्वसाधारण योजनेतून खुल्या प्रवर्गातील लाभार्थीना प्रति युनिट 2,25,000/- रुपये प्रकल्प खर्चाच्या 50% म्हणजेच 1,12,500/- रुपये या मर्यादेत
- अनुसुचित जाती उपयोजना (विघयो) व आदिवासी उपयोजनेतून अनुक्रमे अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या 75% म्हणजेच 1,68,750/- रुपये मर्यादेपर्यंत शासकीय अनुदान अनुज्ञेय देय राहील.
- प्रकल्पासाठी शासकीय अनुदानाव्यतिरिक्त खुल्या प्रवर्गातील लाभाथ्यांनी उर्वरीत 50% रक्कम म्हणजेच 1,12,500/- रुपये व अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्याने 25% रक्कम म्हणजेच 56,250/- रुपये स्वतः अथवा बँकेकडून / वित्तीय संस्थाकडून कर्ज घेऊन उभारावावयाची आहे.
- बँक / वित्तीय संस्थेकडून कर्ज घेणाऱ्या खुल्या प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी किमान 10% स्वहिस्सा व उर्वरीत 40% बँकेचे कर्ज त्याचप्रमाणे अनुसूचित जाती / जमातीच्या लाभार्थ्यांसाठी किमान 5% स्वहिस्सा व उर्वरीत 20% बँकेचे कर्ज याप्रमाणे रक्कम उभारावयाची आहे.
या योजनेंतर्गत 50 टक्के अनुदानावर अंडी उत्पादनासाठी वाटप करावयाच्या तलंगा, नर कोंबडे व एक दिवशीय कुक्कुट पक्षी यांच्या गटाच्या आधारभूत किंमत खालीलप्रमाणे आहे.
सुधारीत दराने तलंगा गट वाटपासाठी उर्वरीत 50 टक्के रक्कम म्हणजेच 5420/- रुपये आणि 100 एक दिवसीय सुधारित कुक्कुट पक्षांच्या पिल्लांचे गट वाटपासाठी उर्वरीत 50 टक्के रक्कम म्हणजेच 14750/- रुपये लाभार्थी स्वहिस्सा राहील.
पंचायत समिती कुक्कुटपालन योजना अंतर्गत दिल्या जाणाऱ्या पक्ष्यांच्या जाती
- आयआयआर
- ब्लॅक
- अस्ट्रॉलॉप
- गिरीराज
- वनराज
- कडकनाथ
- व इतर शासन मान्य जातीचे पक्षी
नाबार्ड कुक्कुट पालन योजना अंतर्गत दिला जाणारा प्राधान्यक्रम
- दारिद्र्यरेषेखालील लाभार्थी
- भूमिहीन शेतमजूर
- मागासवर्गीय
- अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी
कुक्कुट पालन योजना लाभार्थी
- महाराष्ट्र राज्यातील नागरिक जे स्वतःचा कुकुट पालन व्यवसाय सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत.
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र 2023 लाभ
- राज्यातील बेरोजगार कमी होईल.
- राज्यात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होण्यास मदत होईल.
- पशुपालनाला चालना मिळेल.
- राज्यातील जे व्यक्ती स्वतःचा एखादा उद्योग सुरु करण्यासाठी इच्छुक आहेत ते या योजनेच्या सहाय्याने स्वतःचा कुकुट पालन उद्योग सुरु करू शकतील.
- कुकुट पालन योजना महाराष्ट्र अंतर्गत लाभार्थी मांस आणि अंडी विकून आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.
- शेतकऱ्यांना शेतीसोबत कुकुट पालन हा जोडधंदा म्हणून सुरु करता येईल ज्यामुळे त्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल.
- जे व्यक्ती उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक दृष्ट्या कमकुवत आहेत त्यांना हि योजना फायद्याची ठरणार आहे.
- राज्याचा औद्योगिक विकास होईल.
कुक्कुट पालन कर्ज योजना लाभार्थी निवडीचे निकष
सर्वसाधारण प्रवर्गातील तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांची निवड खालील प्राधान्यक्रमानुसार करण्यात येईल.
1. अत्यल्प भूधारक शेतकरी (1 हेक्टरपर्यंतचे भूधारक)
2. अल्प भूधारक शेतकरी (1 ते 2 हेक्टरपर्यंतचे भूधारक)
3. सुशिक्षित बेरोजगार (रोजगार व स्वयंरोजगार केंद्रात नोंद असलेले)
4. महिला बचत गटातील लाभार्थी/ वैयक्तिक महिला लाभार्थी
कुक्कुट पालन योजना अंतर्गत आवश्यक पात्रता
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.
कुक्कुट पालन योजना अंतर्गत अटी व शर्ती
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र अंतर्गत आवश्यक कागदपत्रे
- आधार कार्ड
- रेशन कार्ड
- मतदान कार्ड
- रहिवासी दाखला
- जमिनीचा ७/१२ व ८अ
- पासपोर्ट आकाराचे फोटो
- बँक खात्याचा तपशील
- मोबाईल नंबर
- ई-मेल आयडी
- शपथपत्र
- पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे
- अर्जदाराला आपल्या क्षेत्रातील जिल्हा कार्यालयात पशुसंवर्धन विभागात जाऊन कुकुट पालन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल.
- अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी लागतील व सदर अर्ज कार्यालयात जमा करावा लागेल.
- जिल्हा अधिकारी तुमच्या अर्जाची व कागदपत्रांची छाननी करून तुम्ही योजनेअंतर्गत पात्र असल्यास लाभाचे वितरण करण्यात येईल.
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र मराठी अंतर्गत विचारले जाणारे प्रश्न
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र मराठी अंतर्गत किती अनुदान दिली जाते?
कुक्कुट पालन योजना महाराष्ट्र अंतर्गत प्रकल्प किमतीच्या अधिकतम 75 टक्के अनुदान दिले जाते.
कुक्कुट पालन योजनेचा लाभ काय आहे?
योजनेअंतर्गत नागरिक स्वतःचा कुकुट पालन व्यवसाय सुरु करू शकतो.
महाराष्ट्र कुक्कुट पालन योजनेचा उद्देश काय आहे?
राज्यातील नागरिकांना कुकुट पालन उद्योग सुरु करण्यासाठी आर्थिक सहाय्य करणे.
Comments 1