आजच्या लेखामध्ये आपण मिरची लागवड (mirchi lagwad) करण्याची पद्धत पाहणार आहोत. यामध्ये मिरचीसाठी जमीन आणि हवामान कशा प्रकारचे लागते, योग्य असणाऱ्या जाती, मिरचीच्या लागवडीची पद्धत आणि पाणी व्यवस्थापन, मिरचीची काढणी आणि उत्पादन याबद्दल सविस्तर माहिती या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत.
प्रस्तावना (मिरची लागवड)
बाजारात हिरव्या मिरच्यांची वर्षभर मागणी असते. याखेरीज भारतीय मिरचीस परदेशामधून देखील चांगली मागणी आहे. महाराष्ट्र राज्यात अंदाजे एक लाख हेक्टर क्षेत्रावर मिरची पिकाची होत असते. महाराष्ट्रातील मिरची खालील एकूण क्षेत्रापैकी 68 टक्के क्षेत्र हे नांदेड, जळगाव, सोलापुर, धुळे, कोल्हापूर, नागपूर, चंद्रपूर, अमरावती, उस्मानाबाद या जिल्ह्यात आहे. मिरची मध्ये अ व क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे मिरचीचा संतुलित आहारात समावेश केला जातो. स्वाद आणि तिखटपणा यामुळे मिरची महत्त्वाचे मसाला पिक मानले जाते. मिरचीचा औषधी उपयोग सुद्धा केला जातो.
जमीन (मिरची लागवड) | best soil for mirchi lagwad –
मिरची लागवडीसाठी पाण्याचा उत्तम निचरा होणाऱ्या आणि मध्यम भारी जमिनीमध्ये मिरचीचे पीक अतिशय चांगले येते. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरली, तरी देखील मिरचीचे पीक चांगले येते. पाण्याचा योग्य निचरा न होणाऱ्या जमिनी मध्ये मिरचीचे पीक अजिबात घेऊ नये. पावसाळ्यात आणि बागायती मिरचीसाठी पावसाळ्यात बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. तर उन्हाळ्यात मध्यम ते भारी जमिनीवर mirchi lagwad करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरची पिकाचे उत्पादन चांगले येते.
हवामान | best climate for growing chillies –
मिरची पिकाची वाढ उष्ण आणि दमट हवामानात चांगली होते आणि उत्पादनही चांगले मिळते. या पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूंमध्ये करता येते. पावसाळ्यात जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे मिरचीचा फुलांची गळ जास्त होते. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले असते. मिरचीचा झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चांगली होते. तापमानातील तफावतीमुळे फुले आणि फळे यांची गळ मोठ्या प्रमाणावर होते आणि उत्पादनामध्ये घट येते. बियांची उगवण 18 ते 27 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये चांगली येते.
मिरची लागवड | mirchi lagwad mahiti –
मिरची खरीप पिकाची लागवड जून, जुलै महिन्यामध्ये करावी. तर उन्हाळी मिरची पिकाची लागवड जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये करावी.
मिरची च्या टॉप व्हरायटी | best variety of chilli in maharashtra –
क्रमांक | नाव | कंपनी | किंमत |
1 | सितारा | सेमिनिस | 800 रूपये (1500 बिया प्रति बॅग) |
2 | अरमौर मिरची एफ 1 | BASF | 800 रूपये ( 1500 बिया प्रति बॅग) |
3 | एन एस 1101 | नामधारी सीड्स | 429 रूपये ( 2000 बिया प्रति बॅग) |
4 | यू एस 730 | BASF | 540 रूपये (1500 बिया बॅग) |
5 | VNR 145 | व्ही एन आर सीड्स | 470 रूपये प्रति 10 ग्रॅम |
6 | एच पी एच 5531 | सिंजेंटा | 700 रूपये प्रति 1500 सीड्स |
7 | इंडिका | बायोसीड | 550 रूपये प्रति 10 ग्रॅम सीड्स |
8 | FB मोनालिसा (2222) | फार्मसन बायोटेक | 1599 रूपये प्रति 10 ग्रॅम बिया |
9 | सर्पण एफ 1 (अन्नीगेरी डिलक्स) | सर्पण सीड्स | 490 प्रति 10 ग्रॅम. |
दर हेक्टरी प्रमाण | seed rate for mirchi lagwad –
दर हेक्टरी एक ते दीड किलो मिरचीचे बियाणे वापरावे.
पूर्वमशागत | land preparation for chilli –
एप्रिल, मे महिन्यामध्ये जमीन नांगरून विखरून तयार करावी. हेक्टरी नऊ ते दहा टन कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून लागवडीसाठी जमीन तयार करावी.
मल्चिंग पद्धतीने मिरची लागवड | use of mulching in mirchi lagwad –
1. सव्वा ते दीड फुटाच्या अंतराने करणारा हा त्याच्या नागमोडी पद्धतीने मल्चिंग छिद्रे पाडून की mirchi lagwad करणे आवश्यक आहे.
2. रोपांची लागवड साडेसात ते आठ हजार रुपये एकरी या हिशोबाने तुम्हाला मिरचीचे लागत असतात.
3. तुम्ही अगोदर बेसल डोस टाकायचा आहे. त्यानंतर मल्चिंग करायचे आहे.
4. नंतर त्या नागमोडी अंतर आणि तुम्ही सव्वा दीड फुटावर तुम्हाला छिद्रे पाडून लागवड करायची आहे.
5. शक्यतो नर्सरीमधील निरोगी रोपांची लागवड करावी.
6. जेणेकरून निरोगी आणि चांगले नर्सरीतून रोपं घेतल्याने आपला वेळही वाचतो आणि आपल्याला चांगले पोषक रोप मिळते.
7. निगराणी करताना फवारणी बाकीच्या गोष्टी त्याच्या मध्ये आपला कुठलाही वेळ जात नाही.
8. यामुळे मित्रांनो रोपांची लागवड नर्सरीतून जर केली तर जास्तीचा फायदा आपला होत असतो.
आंतरमशागत | intercultural operations in chilli –
1. मिरचीच्या रोपांच्या लागवडीनंतर 20 ते 25 दिवसांनी पहिली खुरपणी करावी
2. त्यानंतर तणांच्या तीव्रतेनुसार खुरपण्या करून शेत तणविरहीत ठेवावे.
3. खरीप mirchi lagwad नंतर 2 ते 3 आठवडयांनी रोपांना माीची भर दयावी.
4. बागायती पिकांच्या बाबतीत रोपांच्या लागवडीनंतर 2 महिन्यांनी हलकी खांदणी करून सरी फोडून झाडांच्या ओळीच्या दोन्ही बाजूंनी मातीची भर द्यावी.
खते | Fertiliser for mirchi lagwad –
1. वेळेवर वरखते दिल्यामुळे मिरची पिकाची जोमदार वाढ होते.
2. मिरचीच्या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्टरी 50 किलो नत्र 50 किलो स्फूरद आणि ओलिताच्या पिकासाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र 50 किलो स्फूरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
3. यापैकी स्फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्या लागवडीच्या वेळी द्यावीत.
4. नत्राची उर्वरीत अर्धी मात्रा रोपांच्या लागवडीनंतर 30 दिवसांनी बांगडी पध्दतीने द्यावी.
पाणी व्यवस्थापन | water management in mirchi lagwad –
1. मिरची बागायती पिकाला जमिनीच्या मगदुराप्रमाणे पाणी द्यावे.
2. प्रमाणापेक्षा जास्त किंवा कमी पाणी देऊ नये. झाडे फूलावर आणि फळावर असताना झाडांना पाण्याचा ताण 3. देऊन रोपे लावणीनंतर 10 दिवसात शेतात रोपांचा जम बसतो.
4. या काळात 1 दिवसाआड पाणी दयावे.
5. त्यानंतर 5 दिवसांच्या किंवा एक आठवडयाच्या अंतराने पाणी दयावे.
6. साधारणतः हिवाळयात 10 ते 15 दिवसांच्या अंतराने तर उन्हाळयात 6 ते 8 दिवसांच्या अंतराने पिकाला पाणी दयावे.
मिरची कीड व रोग नियंत्रण | chilli pest and disease management –
अ. रोग –
1. मिरची मर रोग | wilt of chilli –
हा रोग कोलीटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वतुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत रोगाचे जंतू वेगाने वाढतात आणि फळावर काळपट चटटे दिसतात. अशी फळे कुजतात आणि गळून पडतात. बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंडयाकडून खाली वाळत जातात. प्रथम कोवळे शेंडे मरतात. रोगांचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडे सुकून वाळतात तसेच पानांवर आणि फांद्यांवर काळे ठिपके दिसतात.
उपाय – या रोगाची लक्षणे दिसताच शेंडे खुडून त्यांचा नाश करावा. तसेच डायथेन झेड-78 किवा धानुका कंपनीचे धनुका एम 45, डायथेन एम 45 यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक औषध 25 ते 30 ग्रॅम 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसताच दर 10 दिवसांच्या अंतराने 3 ते 4 वेळा फवारावे.
3. भुरी रोग | powdery mildew in chilli –
भूरी रोगामुळे मिरचीच्या पानाच्या वरच्या आणि खालच्या बाजूवर पांढरी भूकटी दिसते. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास झाडाची पाने गळतात.
उपाय – भुरी या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच 30 ग्रॅम पाण्यात मिसळणारे गंधक 10 लिटर पाण्यात मिसळून मिरचीच्या पिकावर 15 दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
B. किड –
1. फूलकिडे | thrips in chilli –
हेक्टरी किटक आकाराने अतिशय लहान म्हणजे 1 मिली पेक्षा कमी लांबीचे असतात. त्यांचा रंग फिकट पिवळा असतो. किटक पानावर ओरखडे पाडून पानाचे रस शोषण करतात. त्यामुळे पानाच्या कडा वरच्या बाजूला चुरडलेल्या दिसतात. हेक्टरी किटक खोडातील रसही शोषून घेतात. त्यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.
उपाय – रोपलावणीपासून 3 आठवडयांनी पिकावर 15 दिवसांच्या अंतराने 8 मिलीमिटर टाटा कंपनीचे माणिक, ॲसेटामाप्रिड 20% एस.पी. 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
2. मावा | aphids in chilli –
हेक्टरी किटक मिरचीची कोवळी पाने आणि शेडयांतील रस शोषण करतात. त्यामुळे नविन पालवी येणे बंद होते.
उपाय – लागवडीनंतर 10 दिवसांनी 15 मिली सिंजेंटा कंपनीचे एकालक्स, क्विनोलफॉस 25 ई. सी. टक्के प्रवाही 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
काढणी | chilli harvesting –
1. हिरव्या मिरचीची तोडणी साधारणपणे लागवडीनंतर अडिच महिन्यांनी सुरु होते.
2. पुर्ण वाढलेल्या व सालीवर चमक असलेल्या हिरव्यसा फळांची तोडणी देठासह 10 दिवसांच्या अंतराने करावी.
3. साधारपणपणे हिरव्या मिरच्यांची तोडणी सुरु झाल्यानंतर 3 महिने तोंडे सुरू राहातात.
4. अशा प्रकारे 8 ते 10 तोडे सहज होतात.
5. वाळलेल्या मिरच्यांसाठी त्या पूर्ण पिकून लाल झाल्यावरच त्यांची तोडणी करावी.
उत्पादन | chilli yield per acre –
जातीपरत्वे ( बागायती) हिरव्या मिरच्यांचे हेक्टरी 80 ते 100 क्विंटल उत्पादन मिळते. वाळलेल्या लाल मिरच्यांचे उत्पादन 9 ते 10 क्विंटल निघते. व कोरडवाहू मिरचीचे उत्पादन 6 ते 7 क्विंटल येते.
FAQs | वारंवार विचारले जाणारे प्रश्न –
1. प्रश्न – मिरची वाढण्यास किती वेळ लागतो?
उत्तर – काही पेरणीपासून 60 दिवसांत पिकलेली फळे देतात तर काहींना 120 दिवसांचा कालावधी लागतो.
2. प्रश्न – उन्हाळी मिरची लागवड कधी करावी?
उत्तर – उन्हाळी मिरचीची लागवड सरी वरंबा पद्धतीने मार्च महिन्यात पूर्ण करावी.
3. प्रश्न – मिरचीची किती वेळा काढणी करता येईल?
उत्तर – फळे काढणे सुमारे 2 महिने चालू राहते आणि वर्षाला 6 पिकिंग केले जाते.
5. प्रश्न – मिरचीच्या झाडांसाठी तुम्ही कोणत्या प्रकारचे खत वापरता?
उत्तर – मिरची पिकाला खत दिल्यानंतर त्याची वाट जोरदार पद्धतीने होते मिरची पिकासाठी कोरडवाहू हेक्टरी 50 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि बागायत मिरची पिकीसाठी दर हेक्टरी 100 किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.