झेंडू लागवड संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेवूयात. दसरा, दिवाळी किंवा इतर सण असतील तर यामध्ये फुलांची खूप मोठी मागणी होताना आपल्याला दिसते आहे. यामध्ये झेंडूची लागवड कशा पद्धतीने करायचे याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.
झेंडू लागवड करताना काय काळजी घेतली पाहिजे.
शेतकरी बंधुंनो झेंडू लागवड करताना सर्वप्रथम जमीन भुसभुशीत कारण घ्यावी त्यावर सर्वसाधारण चार फुटाचे बेड पाडून घ्यावेत.
बेड पडल्यावर त्यावर सर्वसाधारण पंचवीस मायक्रोनचे मल्चिंग अंथरून आपण त्याला होल करून लागवड केलेली कधीही चांगली असते.
झेंडू लागवड आधुनिक पध्दत खत व्यवस्थापन
बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये झेंडू पिक लागवड विषयी असा प्रश्न वारंवार येतो की आपण झेंडूसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत चांगलं उत्पादन मिळण्यासाठी रासायनिक कि जैविक खत वापरली पाहिजे?
रासायनिक कि जैविक खत वापरासंदर्भात आपण या लेखांमध्ये माहिती घेणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जमीन पूर्ण नांगरून भुसभुशीत करून घ्यावी.
बऱ्याच वेळा शेतकरी झेंडू या पिकाला सुरुवातीला एकदाच खत देतो आणि देत नाही. याचा परिणाम हा शाकीय वाढीवर होतो, म्हणून सर्वसाधारण 1 एकरामध्ये 6 हजार झेंडूच्या झाडांची लागवड करता येते.
सर्वसाधारण एका झाडापासून दोन ते अडीच किलो फुलाचे उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. यासाठी खत व्यवस्थापन करणे हे अत्यंत गरजेचे आहे.
झेंडू लागवड आधुनिक पध्दत अशी करा लागवड
शेतकरी बांधवानी 1 एकरामध्ये 6 हजार झाडे लावले तर एकरी सर्वसाधारण 10 ते 12 टन उत्पादन मिळू शकते. झेंडूच्या शेतीमध्ये विद्राव्य खताचे व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे.
झेंडूची लागवड झाल्यानंतर जो बेसळ डोस टाकायचा आहे त्यामध्ये 18:46 खत, 15:15:15 किंवा 10:26:26 अशा खतांचा शेतकरी वापर करू शकतात.
सर्वसाधारण शंभर किलोला सूक्ष्म अन्नद्रव्य 30 किलो तर सल्फरचे खत दहा किलो असे प्रमाण वापरणे योग्य ठरेल.
ठिबक सिंचन व्यवस्था झेंडू लागवड आधुनिक पध्दत
झेंडू लागवड करताना झेंडू पिकासाठी पाण्याचे नियोजन करणे अत्यंत महत्वाचे आहे. पाण्याच्या योग्य नियोजनासाठी मल्चिंग अंथरण्यापूर्वी त्यावर 16 एम एम किंवा 20 एम एम चे ठिबक सिंचन बेडवर पांगवावे.
झेंडूच्या जाती
भारतातील मार्केटमध्ये झेंडूच्या अनेक प्रकारच्या जाती उपलब्ध आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
1) झेंडूमध्ये सगळ्यात पहिली चालणारी जी व्हरायटी आहे ती मखमली. झेंडूची मखमली जात बुटकी असते, याची फुले दुरंगी असतात. या जातीची रोपे तुम्ही कुंडीत देखील लावू शकता.
2) नंबरची व्हरायटी जी आहे ती म्हणजे गेंदा. या जातीमध्ये पिवळा आणि भगवा झेंडू असे प्रकार असतात. गेंदा जातीच्या फुलांची मागणी हारासाठी सर्वात जास्त आहे.
3) जात आपण या ठिकाणी समजून घेऊ आणि ती म्हणजे गेंदा डबल. या जातीची फुले आकाराने मोठे असतात परंतु संख्येने कमी येतात. गेंदा डबल या जातीच्या फुलांना कटफळ म्हणून ओळखले जाते.
झेंडूच्या आफ्रिकन जाती झेंडू लागवड आधुनिक पध्दत
झेंडूच्या इतर विदेशी जाती सुद्धा आहेत त्यामध्ये आफ्रिकन जात आहे. या झेंडूची जी झाडं आहेत तर ती 100 ते 150 cm पर्यंत वाढतात.
या फुलांचा रंग केशरी आणि पिवळा असतो. या प्रकारात पांढरी फुले असलेली जात विकसित झालेली आहे या प्रकारातील फुले मोठे प्रमाणात हार बनवण्यासाठी वापरतात ती फुले दिसायला टपोरी असतात.
आफ्रिकन झेंडूच्या जाती खालीलप्रमाणे आहेत.
1. हॅलो सुप्रीम.
2. ब्रेकर.
3. स्पेन बोर्ड.
4. आफ्रिकन टोल/ डबल मिक्स.
5. हवाई.
6. संजय.
7. आफ्रिकन डबल ऑरेंज आफ्रिकन झेंडूच्या जातीमध्ये मोडल्या जातात.
फ्रेंच झेंडूच्या जाती
1 स्पे.
2 बटर बॉल तीन.
3 प्लेस.
4 लेमन ड्रॉप्स.
5 फ्रेंच डबल मिक्स या जातीमध्ये सुद्धा उपलब्ध आहेत.
भारतात चालणाऱ्या झेंडूच्या ज्या महत्त्वाच्या जाती आहेत त्यामध्ये मखमली ही जात बुटकी असते याची फुले दुरंगी असतात या जातीची रोपे तुम्ही कुंडीत देखील लावू शकतात.
गेंडा या जातीमध्ये पिवळा आणि भगवा गेंदा असे दोन प्रकार पडतात याची मागणी हारासाठी सर्वात जास्त आहे.
झेंडू लागवड आधुनिक पध्दत झेंडूचे शेंडे खुडणी फायदे
झेंडू लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे की बऱ्याच शेतकऱ्यांना असे प्रश्न समोर येतात की आम्ही या झेंडूची लागवड केली आहे ती केव्हा खुडायचे आणि त्यापासून काय फायदे होतात.
झेंडूमध्ये फुटव्याचे प्रमाण जर वाढवायचे असेल तर त्याची शेंडे खुडणे हे अत्यंत गरजेचे आहे. झाड सक्षम होण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. लागवड केल्यानंतर झेंडूचा शेंडा हा सर्वसाधारण पंधरा दिवसानंतर खुडला पाहिजे.
झेंडू पिकावरील रोग कीड नियंत्रण
झेंडू पिकावरील येणारे विविध कीड आणि रोगावर खाली दिलेल्या माहितीनुसार संरक्षण आराखडा करून आपण त्यावर योग्य वेळी उपाय केल्यास पीक संरक्षण होऊन उत्पन्नात निश्चितपणाने वाढ होते.
झेंडूवर मुख्यतः पांढरी माशी, लाल कोळी, मावा तुडतुळे व केसाळआळी व रस शोषक किडी व पाने खाणारे अळीचा प्रकार आढळतो. प्रादुर्भाव टाळण्यासाठी एसीपीसेट एक ग्राम अथवा डाय मिथोयेट 1 एम. एल. प्रति लिटर पाण्यात मिसळून 10 ते 15 दिवसाच्या अंतराने फवारणी करावी.
लाल कोळीपासून झेंडूचे संरक्षण करण्याकरता डायकोफोल 2 एम. एल. एक लिटर पाण्यात मिसळून फवारावे. झेंडूवर मर व करपा हा रोग प्रामुख्याने आढळतो. मर हा रोग मुख्यता आफ्रिकन झेंडू पिकावर आढळतो. गर्मीमध्ये उष्ण वातावरण असेल अथवा हवेत पाण्याची प्रमाण आद्रता जास्त असल्यास मर रोग वाढतो. मर रोग आल्यास झेंडूची पाणे पिवळी पडतात व मूळे सडतात.
झेंडूचे पाने पिवळी पडल्यामुळे तसेच झेंडूचे मूळ सडल्यामुळे या रोगाला मर असे म्हणतात. हा रोग होऊ नये म्हणून झेंडू पिकाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने एकात्मिक किड नियोजन करणे गरजेचे असते.
असे करा कीड नियोजन
- झेंडू लागवड करतानाच पाण्याचा निचरा होणारी जमीन निवडावी.
- पिकाची फेरपालट करावी.
- झेंडू पिकात मर दिसताच कार्बनडिझम एक ग्राम प्रति लिटर पाण्यात मिसळून झेंडू पिका भोवती आळवणी करावी आणि फवारणी सुद्धा करावी
अशा पद्धतीने आपण औषधांचा वापर करून कीड नियंत्रण करू शकतो. त्यामुळे झेंडू लागवड आधुनिक पध्दत समजावून घेणे गरजेचे आहे.
झेंडू फुलांसाठी मार्केट
झेंडू फुलाचे मार्केट सर्वसाधारण महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नगर, नाशिक सोलापूर या ठिकाणी आहे. सीझन नुसार झेंडूच्या फुलांना मागणी असते.
सणासुदीच्या दिवसांमध्ये दसरा, दिवाळी किंवा इतर सण असेल नववर्षाचा आगमन होत असेल, लग्न समारंभ असेल किंवा इतर सजावटीचे विविध कार्यक्रम असेल अशावेळी झेंडूच्या फुलांची मागणी जास्त असते. सणासुदीच्या दिवशी झेंडूच्या फुलांना दर चांगला मिळतो. अशा पद्धतीने झेंडू लागवड आधुनिक पध्दत समजून घेतली आहे.
झेंडूची लागवड कशी करावी?
या लेखामध्ये झेंडू शेती संदर्भात सविस्तर माहिती देण्यात आलेला आहे त्यामुळे हा लेख संपूर्ण वाचा.
खत व्यवस्थापन कसे करावे?
18:46, 15:15:15 किंवा 10:26:26 अशा खतांचा शेतकरी झेंडू शेतीसाठी वापर करू शकतात.