माती परीक्षण द्वारे आपणासपीक नक्की करता येतं आणि कमी खर्चात उत्पादन वाढ होत असते तसेच याने पिकांना घ्यावयाच्या खतांची मात्रा पण निश्चित करता येते.
त्याने गैरवाजवी खत देण्यावर नियंत्रण होत असते माती परीक्षणाने शेतातील पिकाचे योग्य नियोजनाने सुमारे दोन पटीपेक्षा जास्त आर्थिक लाभ शेतकऱ्याला प्राप्त होतो.
मातीचा नमुना घेताना सदर जमिनीचा रंग उतार व खोली इत्यादी यावरून विभागणी होत असते. याबद्दल अधिक माहिती घेऊया.
माती परीक्षण गरजेचे रासायनिक खतामुळे जमिनीचे होणारे नुकसान
आपल्याला माहितच आहे की दिवसेंदिवस रासायनिक खताच्या किमती वाढतच आहे. वाढत असलेला रासायनिक खताच्या किमतीचा उत्पादन खर्चामध्ये याचा फार मोठा वाटा आहे.
जे शेतकरी बंधू उत्पादन वाढीच्या दृष्टिकोनातून रासायनिक खताचा वापर करतो आहे तो वापरणे शेतकऱ्याचा असा समज आहे की पिकाला अधिकाधिक रासायनिक खताची मात्रा जर दिली तर पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होते.
परंतु अलीकडे आपण पाहिलेला आहे पिकाला रासायनिक खताची मात्रा वाढवून दिल्यानंतरही पाहिजे त्या प्रमाणात पिकाचे उत्पादन वाढलेले दिसत नाही हे चित्र आपल्याला बघायला मिळते.
शेतकऱ्यांचा लागवड खर्च वाढलेला आहे त्याचं कारण म्हणजे रासायनिक खताच्या वाढत्या किमती होय. रासायनिक खताचा संतुलित वापर करायचा असेल तर त्यासाठी आपल्या जमिनीचे माती परीक्षणे गरजेच आहे.
माती परीक्षण करण्यासाठी मातीचा नमुना घेताना काय काळजी घ्यावी
मातीचा नमुना घेताना तो शास्त्र शुद्ध कसा घ्यावा हे शेतकऱ्यांना माहीत असणं अतिशय आवश्यक आहे. अन्यथा जर चुकीच्या पद्धतीने मातीचा नमुना घेतल्या गेला तर आपल्या जमिनीत असलेले जे अन्नद्रव्याचे प्रमाण योग्य कळणार नाही.
मातीचा नमुना घेत असताना काही खबरदारी सुद्धा घेणं आपल्याला गरजेचे आहे. परंतु आपण पाहतो की मातीचा नमुना साधारणतः शेतकरी कुठल्याही हंगामामध्ये पीक उभे असतांना घेऊ नये. फळबागेचा मातीचा नमुना घेत असाल तर त्या ठिकाणी फळाच्या झाडाच्या सावलीतला नमुना सुद्धा घेतल्या जातो तर मातीचा नमुना घेत असताना काही खबरदारी पाळणे अतिशय आवश्यक आहे.
माती परीक्षणासाठी मातीचा नमुना कसा घ्यावा
मातीचा नमुना ज्या ठिकाणाहून घ्यायचा आहे त्या ठिकाणाची पहिले निवड करणे अतिशय महत्त्वाचा आहे. ठिकाण निवडत असताना साधारणतः शेताच्या बांधा पासून 8 ते 10 फूट आतमध्ये चारही बाजूकडून कडून घ्यावा.
मातीचा नमुना घेत असताना एखाद्या झाडाच्या सावलीतला किंवा ज्या ठिकाणी गुरं बांधलेले आहे, गुराचा गोठा आहे किंवा त्या ठिकाणी पाणी साचलेला आहे अशा ठिकाणचा मातीचा नमुना चुकूनही घेऊ नये.
मातीचा नमुना ज्या शेतातून आपल्याला घ्यायचा आहे तर ते शेत सर्वप्रथम आपण नजर अंदाज करून त्या ठिकाणी शेताची विभागणी करणे गरजेचे आहे.
विभागणी करत असताना आपण पाहतो बरेचदा 10 एकराचा 5 एकराचा शेत असा तुकडा असतो आणि त्या ठिकाणी त्याच्यातून आपण मातीचा नमुना घ्यायचा असतो.
तर त्याला आपण साधारणतः जर एकसमान एक लेव्हलमध्ये जर आपलं शेत असेल तर अशा लेवलच्या शेतामध्ये आपल्याला नजर अंदाजाने अशा 5 ठिकाणच्या जागा निवड करावी लागेल.
या 5 ठिकाणच्या जागा निवड केल्यानंतर त्या ठिकाणच्या जागेवरून आपल्याला मातीचा नमुना आपले पीक पद्धतीनुसार घेण आवश्यक आहे.
आपल्याकडे जे मुख्य पीक आहे आपण त्या ठिकाणी मूग आहे उडीद आहे तूर आहे सोयाबीन आहे कपाशी आहे असे शेती पीक आहे अशा पिकासाठी आपल्याला जर मातीच्या नमुन्याची तपासणी करायची असेल तर त्या ठिकाणी साधारणता आपल्याला 1 फुटाचा मातीचा गड्डा करून त्या च्या कडेचा मातीचा नमुना गोळा करावा लागेल.
हा मातीचा नमुना कमीत कमी साधारणत 2 ते 3 एकरासाठी 5 ठिकाणच्या जागेवरचा मातीचा नमुना साधारणतः अर्धा अर्धा किलो प्रती खड्ड्यांमधून आपल्याला काढावा लागेल.
हा काढलेला प्रती खड्ड्यामधून अर्धा अर्धा किलोचा मातीचा नमुना पूर्ण एकत्र करावा लागेल आणि एकत्र केलेला हा मातीचा नमुना साधारणतः एका गोणपाटावर घेऊन त्या ठिकाणी त्या मातीच्या नमुन्याचे चार भाग करावे लागेल.
चार भागांमध्ये समोरासमोरच जे मातीचे भाग आहे ते मातीचे दोन भाग आपल्याला काढून टाकावा लागेल. विशेष म्हणजे तपासणीसाठी जाणारया मातीमध्ये खडे गोटे त्यानंतर काचाचे तुकडे प्लास्टिकचे तुकडे असे काही असेल तर ते आपल्याला पहिले वेगळे करणे गरजेचे आहे. मग त्यानंतर हा मातीचा नमुना प्रयोगशाळेसाठी द्यावा लागेल.
बऱ्याचदा आपण पाहतो की हा मातीचा नमुना घेत असताना काही दक्षता घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे आपण म्हटलं की शेती पिकासाठी मातीचा नमुना घेत असतानी साधारणता एक फुटापर्यंत म्हणजे 30 सेंटीमीटर पर्यंत मातीचा नमुना घेणे आवश्यक आहे.
त्यासाठी व्ही आकाराचा खड्डा केल्यानंतर हा खड्डा खोदल्यानंतर त्याच्यातील पूर्ण माती आपल्याला काढून बाहेर टाकून द्यावी लागेल. खड्ड्यामध्ये काठाच्या कपाराची पडलेली माती आपल्याला तपासणीसाठी बाहेर काढावी लागेल.
फळबागेतील माती नमुना कसा घ्यावा
आपण पाहतो की काही शेतकरी बांधव फळबागेचं नियोजन करायचे असते किंवा एखाद्या फळबागेतून आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा असतो तर त्या जागेचा नमुना आपल्याला वेगळ्या पद्धतीने घ्यावा लागेल.
त्या ठिकाणी एखादी संत्र्याची किंवा एखाद्या मोसंबीची किंवा कुठलीही फळबाग असेल तर त्याच्या झाडाच्या दुपारी बारा वाजताच्या सावलीचा घेर सोडून त्या घेराच्या बाहेरचा भाग आपल्याला मातीचा नमुना घेण्यासाठी निवड करावा.
एक खबरदारी आपल्याला आवश्यक आहे की आपण पाहतो की शेती पिकासाठी आपण 1 फुटापर्यंत मातीचा नमुना घेतो परंतु जेव्हा फळबागेसाठी आपण मातीचा नमुना घेतो तर त्याच ठिकाणी आपल्याला साधारणता 1 मीटर खोलीचा आपल्याला चर खोदावा लागेल.
त्या गटामधून आपल्याला प्रत्येक फुटाची माती वेगवेगळी नमुन्याच्या रूपात आपल्याला घ्यावी लागेल. वेगवेगळी म्हणजे वरचा चर जर 120 सेंटिमीटर खोलीपर्यंत चर खोदला तर वरचा चर 0 ते 30 सेंटीमीटर चा 1 वेगळा थर मातीचा नमुना म्हणून घ्यावा लागेल.
त्यानंतर 30 cm ते त्याच्याखाली 60 cm पर्यंतचा दुसरा मातीच्या थराचा नमुना आपल्याला वेगळा घ्यावा लागेल. त्यानंतर 60 ते 90 सेंटीमीटर चा तिसरा नमुना घ्यावा लागेल आणि 90 सेंटीमीटर ते 120 सेंटीमीटर पर्यंतचा मातीचा चौथा नमुना आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल.
हे वेगवेगळे नमुने आपल्याला प्रयोग शाळेमध्ये तपासणीसाठी तपासणीसाठी पाठवावा लागेल.
माती नमुना पिशवीत भरताना काय काळजी घ्यावी.
प्राप्त झाली नाही तर अशा वेळेस प्लास्टिकची पिशवी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वापरता येईल.
येथे खबरदारी अशी घ्यावी लागेल कि प्लास्टिकच्या पिशवीमध्ये जर तुम्ही तो मातीचा नमुना परीक्षनासाठी पाठवत असेल तर त्याला बारीक बारीक छिद्र करणं आवश्यक आहे.
वरच्या भागांमध्ये जेणेकरून मातीमध्ये असलेला ओलावा मॉस्चर बाहेर निघून जाण्यासाठी मदत होईल.
ही एक खबरदारी आपल्याला घेणे आहे आणि त्याच्यावर आपल्याला एक लेबल सुद्धा लावून देणे गरजेचे आहे.
त्या लेबलवर शेतकऱ्याचे नाव त्यांचं गाव शेतकऱ्याचा शेत सर्वे नंबर नमुना गोळा केल्याची तारीख याचा उल्लेख करावा लागणार आहे.
माती तपासणीचे प्रकार
माती परीक्षणामध्ये दोन पद्धतीचे नमुने तपासले जातात. सर्वसाधारण मातीचा नमुना तपासणी ज्यात सहा पॅरामीटर तपासली जातात आणि दुसरा प्रकार म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्याची तपासणी करणे होय म्हणून उत्पादन वाढीसाठी मातीपरीक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.
मातीचा नमुना कसा घ्यावा?
मातीचा नमुना कसा घ्यावा या संदर्भातील सविस्तर माहिती या लेखामध्ये दिलेली आहे. या संदर्भातील एक व्हिडीओ देखील या लेखामध्ये दिलेली आहे.
माती परीक्षणाचे फायदे काय आहेत ?
माती परीक्षण केल्याने खताची योग्य ती मात्रा वापरता येते. त्यामुळे रासायनिक खतावर होणारा खर्च वाचतो व जमीन सुपीक राहण्यास मोठी मदत होते.
Comments 1